कां बरं शिकायचं संस्कृत ?

कां बरं शिकायचं संस्कृत ?

(१) संस्कृत ही सर्व भारतीय भाषांची जननी आहे. आपला हजारो वर्षांचा सर्व सांस्कृतिक वारसा संस्कृतमध्येच आहे.

(२) जगभर कित्येक लोकांना देखील मान्य करावं लागतं, कीं जगातील कुठलीच भाषा संस्कृतसारखी सुसंस्कृत नाहीं.

(३) ज्या भाषेबद्दल जगभरातील लोक कौतुकानं पाहतात, ती भाषा आपल्या मराठी भाषेची जननी आहे. तर मग, आपल्यालाही तिचा अभ्यास नको कां करायला ?

(४) संस्कृतचं जितकं शिक्षण जनमानसात रुजेल, तितका समाजातला सुसंस्कृतपणाही अधिक चांगला असेल. पर्यायानं सारं समाजजीवनच तितकं सुसंस्कृत असेल, याबद्दल शंकाच ठेवायची जरूर नाहीं.

कसं आणि कितपत शिकायचं संस्कृत ?

(१) हा ब्लॉग सुरूं करण्यामागे माझी इतकीच अपेक्षा आहे, कीं जनमानसांत संस्कृत रुजायचं म्हणजे संस्कृतमधली सुवचनं, सुभाषितं ह्यांची तरी त्यांच्या अर्थासह अशी ओळख व्हावी, कीं वाचकांमधें संस्कृतची गोडी रुजेल. एकदा गोडी रुजली, कीं “आणखी पाहिजे” अशी आंस आपोआप वाढेल आणि वाढतच जाईल.

(२) कुठलीही भाषा नीट समजून घेण्यासाठी व्याकरण समजणं देखील आवश्यक असलं तरी, सुरवातीपासून त्याचा फार उहापोह करायचा नाही, हें धोरण मनांत आहे. तसा प्रयोग आधीच चार पाठ इंग्रजीत तयार करून माझ्या http://slabhyankar.wordpress.com ह्या दुस-या ब्लॉगवर यशस्वी झाले आहेत, असं म्हणणं अवास्तव होणार नाहीं

(३) हा ब्लॉग आहे. तेव्हां वाचकांच्या प्रतिक्रिया, सूचना या सर्वांचा मोलाचा वांटा असणार आहे. सर्वांच्या सहकार्यानंच हें शिक्षण समृद्ध व्हायचं आहे. आपण सर्वांनी मिळूनच शिकायचं आहे. मीही एक विद्यार्थीच आहे, ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. गीतेत भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, “तुला फक्त निमित्त व्हायचं आहे.” तसा मीही केवळ निमित्तमात्र आहे.

चला, तर संस्कृत शिकूं या.
आपला स्नेहाभिलाषी,

श्रीपाद अभ्यंकर

Advertisements

8 thoughts on “कां बरं शिकायचं संस्कृत ?

  1. आपला उपक्रम चांगला आहे हे दँया
    याचा वापर मी व्हाट्स अप वर केला तर चालेल का?

  2. अभिवादये,अभ्यंकर महोदय! भवतं दीर्घकालतः जानामि।भवतः प्रयासः वंदनीयः।संस्कृतानुरागिनः माद्शस्य बहु उपकाराय !

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s